आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवड:वैरण 3 हजार, वाढे 200 शेकडा, दूध दरवाढ कासवगतीने; दोन वर्षात दूध दरात प्रतिलिटर पाच ते सात रुपयांची वाढ, चाऱ्याच्या भावात मात्र 20 टक्क्यांनी वाढ

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुध उत्पादनात अग्रेसर असलेल्या नगर जिल्ह्यात दररोज सुमारे २५ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. चारा व खाद्याचे दर झपाट्याने वाढत असले तरी दूध दरवाढ मात्र, कासवगतीने होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचे आर्थिक गणित उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने कोलमडले आहे.

नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन घेतले जाते. दूध व्यवसायाकडे आता शेतीपुरक व्यवसाय म्हणून न पाहता अनेक तरुणही पूर्णवेळ दूध व्यवसायात उतरले आहेत. नगर राज्यात दूध उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो.

दुधाळ जनावरांना हिरव्या, सुक्या चाऱ्याबरोबरच पोषक पशुखाद्याचाही वापर केला जातो. मागील वर्षी वैरणीचा दर अडीच ते तीन हजार रुपये होता, यंदा मात्र, या दरात वाढ होऊन हा दर आता ३ ते ४ हजार रुपये शेकडा (१०० पेंडी) पर्यंत पोहोचला आहे. जानेवारी मार्च या महिन्यांच्या कालावधीत साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असताना वाढे चाऱ्यासाठी उपलब्ध होतात. परंतु, वाढ्यांचे दरही आता शंभर रूपयांहून २०० रूपयांपर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे वालीस पोते वर्षभरापूर्वी ९३० ते १ हजार रूपये होते, आता वालिस खाद्याचा दर १०० ते २०० रुपयांनी वाढला. सरकीपेंडचे पोते बाराशे रुपयांहून १ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

एकीकडे चाऱ्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढत असताना दुधाचे दर मागील दोन
वर्षात प्रतिलिटर पाच ते सात रुपयांनीच वाढले. दुधाला सरासरी ३५ ते ४० रुपये दर मिळाला तरच पशुपालकांचा उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसेल, त्यामुळे दूध दरवाढ आवश्यक असल्याचे पशुपालकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...