आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला व मुलींनी अन्याय व अत्याचारा विरोधात आक्रमकपणे लढण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार स्मरणात ठेवून आपल्या जीवनात यशस्वीपणे मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बजरंग सुडके यांनी केले.
शहरातील वसंतराव नाईक चौक येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी श्री सुडके बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश बोके, जनार्दन रुपनर,पांडुरंग हंडाळ,वसंत घुगरे,पप्पू लोखंडे, संदीप लोखंडे, नानासाहेब पडळकर,अमोल दातीर,महादेव नरोटे आदी उपस्थित होते.
सुडके म्हणाले, कुटुंब चालवताना महिलांची नेहमी संयमी व समजदारीची भूमिका असते. मात्र समाजात वावरताना विकृत प्रवृत्तीच्या लोकांकडून अनेकदा अन्याय-अत्याचाराच्या घटना घडताना आपण पाहतो.अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी निश्चितच अहिल्यादेवींचे विचार महिला व मुलींना प्रेरणादायी राहतील. प्रास्ताविक बाप्पू रुपनर यांनी, सूत्रसंचालन शशिकांत सोलाट यांनी, तर आभार शिवाजी काळे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.