आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाथर्डीत पालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग, पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार

पाथर्डी | अविनाश मंत्री21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिल्यानंतर शहरासह तालुक्यात सावधपणे व अंदाज बांधत राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. पाथर्डी पालिकेच्या एकूण वीस सदस्य, पंचायत समितीच्या दहा गण व जिल्हा परिषदेच्या पाच गटासाठी स्वतंत्रपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आखाड्याची धूळ सर्वबाजूंनी उडाली असली तरी आगामी निवडणुका आरक्षणाशिवाय होतील अशीच शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यकर्त्यांकडून तयारीचा अंदाज घेण्यास प्रारंभ केला. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते. पालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असाच चुरशीचा सामना रंगण्याची चिन्हे प्रथमदर्शनी वाटत असले तरी ऐनवेळी काही जुन्या कार्यकर्त्यांकडून तिसरी आघाडी पुढे केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठेकेदारी, टक्केवारी, निधीची पळवापळवी आदी मुद्दे पालिकेत गेल्या पाच वर्षात अधिक चर्चिले जाऊन सत्ताधारी आघाडीच्या नेत्या आमदार मोनिका राजळे यांनी अधिक मोकळीक दिल्याची जाणीव राजळे यांना गेल्या सहा महिन्यात झाली. मुदत संपेपर्यंत सत्ताधारी आघाडी एकसंघ राहू शकली नाही. याचा अभ्यास भाजप नेत्यांना करावा लागणार आहे. विरोधकांनी सुद्धा पालिकेत विरोधी भूमिका प्रभावीपणे मांडली नसल्याची खंत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना वाटते. भाजपच्या किमान पाच, सहा जागांमध्ये आमदार राजळेंकडून बदल केला जाऊ शकतो, अशी चर्चा सत्ताधारी आघाडीत शेवटच्या दिवसापर्यंत होती. पालिका व अन्य स्थानिक निवडणुकांच्या बाबतीत आमदार मोनिका राजळे व अन्य पक्षीय नेत्यांपेक्षा अधिक सावध ठरल्या असून विरोधक आक्रमक झाले. मनसेची स्वतंत्र ताकद निवडणुकीसाठी नसली तरी भाजप मनसे युती झाल्यास मनसेला भाजपमुळे म्हणजे आमदार राजळेंमुळे बळ मिळणार आहे. शहरात शिवसेनेची आमदार राजळेंबरोबर फारशी शत्रुत्वाची भावना दिसत नसून काँग्रेस पक्ष अजून तयारीला लागलेला नाही. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अगोदर की पालिकेची निवडणूक अगोदर होणार यावर दोन्ही संस्थांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस सुरुवात

यांच्या भूमिकेने रंगत वाढणार
पाथर्डी पालिका निवडाुकीसाठी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक डॉ. बंडूशेठ भांडकर, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, बंडूशेठ बोरुडे, बंडूपाटील बोरुडे, मुकुंद गर्जे आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या भूमिका निवडणुकीतील रंगत वाढवणाऱ्या ठरणार आहेत.

विखेंची भूमिका महत्त्वाची
खासदार डॉ. सुजय विखे यांची भूमिका आमदार मोनिका राजळे यांना बळ देणारे राहील, असा विश्वास राजळे समर्थकांना वाटून अभय आव्हाड यांची राजकीय गुळणी कधी उघडणार याचे वेळापत्रक खासदार डॉ. सुजय विखे ठरवतील असे आजचे चित्र आहे.

अॅड. ढाकणेंचीही कसरत
राष्ट्रवादीचा प्रभाव पूर्वीपेक्षा शहरात वाढला असला तरी तो राजकीयदृष्ट्या कॅश कसा करावा, यासाठी ॲड. प्रताप ढाकणे यांना कसरत करावी लागणार आहे. पालिकेच्या पाच वर्षांतील कारभार कसा आदर्श झाला, याबाबत आमदार मोनिका राजळे यांना मतदारांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

सामना रंगण्याची चिन्हे प्रथमदर्शनी वाटत असले तरी ऐनवेळी काही जुन्या कार्यकर्त्यांकडून तिसरी आघाडी पुढे केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठेकेदारी, टक्केवारी, निधीची पळवापळवी आदी मुद्दे पालिकेत गेल्या पाच वर्षात अधिक चर्चिले जाऊन सत्ताधारी आघाडीच्या नेत्या आमदार मोनिका राजळे यांनी अधिक मोकळीक दिल्याची जाणीव राजळे यांना गेल्या सहा महिन्यात झाली. मुदत संपेपर्यंत सत्ताधारी आघाडी एकसंघ राहू शकली नाही. याचा अभ्यास भाजप नेत्यांना करावा लागणार आहे. विरोधकांनी सुद्धा पालिकेत विरोधी भूमिका प्रभावीपणे मांडली नसल्याची खंत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना वाटते. भाजपच्या किमान पाच, सहा जागांमध्ये आमदार राजळेंकडून बदल केला जाऊ शकतो, अशी चर्चा सत्ताधारी आघाडीत शेवटच्या दिवसापर्यंत होती. पालिका व अन्य स्थानिक निवडणुकांच्या बाबतीत आमदार मोनिका राजळे व अन्य पक्षीय नेत्यांपेक्षा अधिक सावध ठरल्या असून विरोधक आक्रमक झाले. मनसेची स्वतंत्र ताकद निवडणुकीसाठी नसली तरी भाजप मनसे युती झाल्यास मनसेला भाजपमुळे म्हणजे आमदार राजळेंमुळे बळ मिळणार आहे. शहरात शिवसेनेची आमदार राजळेंबरोबर फारशी शत्रुत्वाची भावना दिसत नसून काँग्रेस पक्ष अजून तयारीला लागलेला नाही. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अगोदर की पालिकेची निवडणूक अगोदर होणार यावर दोन्ही संस्थांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

बातम्या आणखी आहेत...