आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:धान्याच्या ट्रकची चोरी करणारा अटकेत, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धान्याच्या ट्रकची चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून १४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

२२ मार्च रोजी सुवर्णज्योत हॉटेल समोरुन १४ लाख ३० हजार रुपये किंमतीचे मका धान्य भरलेले ट्रक तीन इसमांनी धाक दाखवून पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश वाकडे (रा. शेवगांव) यांनी फिर्याद दिली होती. तालुका पोलिसांनी आरोपी विकास अनाजी शेळके (वय ४२, रा. शिरुर, जि. पुणे) यास ताब्यात घेवून १४ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मका धान्य भरलेला ट्रक हस्तगत केला आहे. आरोपीच्या इतर दोन साथीदारांचा तपास सुरु आहे. आरोपीस २६ मार्चपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक रणजीत मारग, सफौ दिनकर घोरपडे, पोकॉ विशाल टकले, पोकॉ संदीप जाधव, पोकॉ विक्रांत भालसिंग, पोहेकॉ गणेश लबडे, पोना रवि सोनटक्के यांनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...