आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटबंधारे:1972 नंतर प्रथमच मुळा पाटबंधारेने वसूल केले विक्रमी 9 कोटी 69 लाख, नगर मनपाकडून 1 कोटी 57 लाख वसूल

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळा पाटबंधारे विभागांतर्गंत १९७२ पासून सिंचनाला सुरूवात झाली. पाणीवापर संस्था तसेच बिगर सिंचन अंतर्गत येणाऱ्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. वर्षभरातच पाटबंधारे विभागाने विक्रमी ९ कोटी ६९ लाख ४१ हजार वसूल केले. ही वसुली मागील ५० वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

मुळा धरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल १६ हजार २११ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुळा डावा व उजव्या कालव्यांतर्गत जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे. या विभागांतर्गत जिल्ह्यात २७९ पाणीवापर संस्था, ज्ञानेश्वर, मुळा व वृद्धेश्वर या साखर कारखान्यांसह, अहमदनगर महानगर पालिका, राहुरी व देवळाली नगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरठ्यापोटी दरवर्षी पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न होतात. परंतु, पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, शाखाधिकारी, कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकूनसह सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नोटिसा बजावून केलेल्या पाठपुराव्यानंतर इतिहासात प्रथमच उच्चांकी ९ कोटी ६९ लाखांची पाणीपट्टी वसूल झाली आहे. त्यापैकी महानगर पालिकेने १ कोटी ५७ लाखांचा भरणा पाटबंधारे विभागाकडे केला आहे. सद्यस्थितीत सुमारे १० कोटींची थकबाकी आहे.

पाच वर्षांतील वसुली
४ कोटी ३२ लाख (२०१६ ), ३ कोटी ८२ लाख (२०१७), ४ कोटी २७ लाख (२०१८), ६ कोटी २९ लाख (२०१९), ५ कोटी २३ लाख (२०२०), ८ कोटी ७९ लाख (२०२१) तर २०२२ मार्चअखेर तब्बल ९ कोटी ६९ लाखांची वसुली झाली. त्यात २ कोटी ९ लाख सिंचन क्षेत्राचे तर ७ कोटी ५९ लाख हे बिगरसिंचन क्षेत्रातील पाणीपट्टी आहे.

बातम्या आणखी आहेत...