आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह स्टोरी:...अडीच महिन्यांपासून ‘ते’ अमरधाममध्ये 24 तास करत आहेत अंत्यविधीची सेवा

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतदेह रुग्णवाहिकेतून उतरवून अग्निडाग देणे किंवा विद्युतदाहिनीत ठेवण्याची जबाबदारी अमरधाम व्यवस्थापनाचीच

कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याचा अंत्यविधी प्रशासकीय व्यवस्थेमार्फतच केला जातो. फैलाव वाढण्याबरोबच मृत्यूचे प्रमाणही मागील दोन महिन्यांत वाढले आहे. कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असतानाही जीव धोक्यात घालून अमरधाममधील १२ कर्मचारी मागील दोन ते अडीच महिन्यांपासून २४ तास अंत्यविधीची सेवा देतआहेत. त्यांच्या या कार्याला ‘दिव्य मराठी’चा सलाम…

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोना रुग्णसंख्येने उचांक गाठल्यानंतर जानेवारी २०२१ पर्यंत रुग्णसंख्या कमी होऊन मृत्यूचे प्रमाणही घटले होते. तथापि, फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. बेड, आॅक्सिजन, रेमडेसिविरसह उपचार मिळवण्यासाठी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. दुर्दैवाने कोरोनातच एखाद्याचा मृत्यू झाला, तर पुढे अंत्यविधीसाठीही वाट पाहवी लागते.

नगर शहरासह जिल्हाभरातील जे रुग्ण नगरमध्ये रुग्णालयात दाखल असताना मरण पावले, त्यांचा अंत्यविधी महापालिकेमार्फत अमरधामातच केला जातो. मुलतानचंद बोरा ट्रस्ट व अंत्यसंस्कार साहाय्य मंडळामार्फत अमरधाममध्ये अंत्यविधीची सेवा दिली जाते. फेब्रुवारीत मृत्यूचा आकडा कमी असला, तरी मार्चपासून दररोज सरासरी ३० ते ४० अंत्यविधी अमरधामात होतात. अमरधाममधील व्यवस्थापनाची धुरा व्यवस्थापक स्वप्निल कुऱ्हे यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. संकेत कुऱ्हे, काैस्तुभ वाडेकर, अक्षय पाथरे, संकेत सोळंकी, अर्जुन स्वामी, रोहित सावेकर, केतन विरगुंटला, गणेश स्वामी, मयूर तळेकर, नंदू घोडके, अक्षय पाचारणे आदी बारा कर्मचारी २४ तास अमरधामात अंत्यसंस्कार सेवा करत आहेत.

मेनकापडात गुंडाळलेले मृतदेह रुग्णवाहिकेतून उतरवून सरणावर ठेवून अग्निडाग देणे किंवा विद्युतदाहिनीत ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थापनच पार पाडत आहे. अर्थात या कर्मचाऱ्यांनाही कोरोना होण्याचा धोका आहे, परंतु जीवाची पर्वा न करता हे कर्मचारी २४ तास सेवा देत आहेत. स्वतःच्या घरी अवघ्या काही तासांपुरतेच जाणे शक्य होते. बऱ्याचदा अमरधामात मुक्कामी राहून काही तासच झोप हे कर्मचारी घेतात अन् पुन्हा कामाला लागतात. महामारीच्या या संकटात त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून काैतूक होत आहे.

कर्मचाऱ्यांनी मागील अडीच महिन्यांपासून सुटी घेतलेली नाही
मृतांची संख्या वाढल्यामुळे २४ तास अंत्यविधीचे कार्य आमच्या बारा कर्मचाऱ्यांमार्फत अहोरात्र सुरू आहे. एक-दोन तासच झोप घेता येते. मागील अडीच महिन्यांपासून सुटी घेतलेली नाही. घरच्यांचीही चीडचीड होते, पण आता परिस्थिती बिकट असल्याने आम्ही कर्तव्य तत्परतेने पार पाडत आहोत. सध्या व्हेंटिलेटर, बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते, तशीच धावपळ अंत्यविधीसाठी करावी लागते. मृतांची संख्या अधिक असल्याने वाट पहावी लागते. प्रत्येकाने नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करावे, ही हात जोडून विनंती.'' स्वप्निल कुऱ्हे, अंत्यसंस्कार साहाय्यक मंडळ, अमरधाम, अहमदनगर.

  • जीव धोक्यात घालून अमरधाममधील १२ कर्मचारी मागील दोन ते अडीच महिन्यांपासून २४ तास देताहेत अंत्यविधीची सेवा
  • महामारीच्या या संकटात कर्मचाऱ्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून होतेय काैतूक
  • मार्चपासून दररोज सरासरी ३० ते ४० अंत्यविधी अमरधामात
  • कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांच्या अंत्यविधीसाठी सरण रचताना अमरधाम व्यवस्थापनाचे कर्मचारी आिण व्यवस्थापक स्वप्नील कुर्हे.
बातम्या आणखी आहेत...