आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • For Years, Shrigonda's Questions Were Like ..., Rajesh Dange's Criticism Of The Municipal Council Movement; Information Through Their Press Release | Marathi News

राजकीय वाद:वर्षानुवर्षे श्रीगोंद्याचे प्रश्न जैसे थे..., नगरसभा आंदोलनाचे राजेश डांगे यांची टीका; त्यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहीती

श्रीगोंदे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजना, औद्योगिक वसाहत, उपजिल्हा रुग्णालय असे प्रलंबित प्रश्न वर्षानुवर्षे राजकीय वादात अडकले असून यामुळे तालुक्याची मोठया प्रमाणावर पिछेहाट झाली आहे. या प्रश्नांना नगरसभा आंदोलन वाचा फोडणार असल्याची माहिती नगरसभा आंदोलन अध्यक्ष राजेश डांगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली

सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील २४० गावांसाठी टेंभू प्रकल्प उभा राहिला. ३ जिल्हे अंतर पार करून डोंगरावरून पाइपलाइनद्वारे पाणी उचलण्याची किमया साधली गेली. पण आपल्या तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजना १९९८ पासून धूळखात पडून आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत हा मुद्दा गाजतो. नंतर सर्वांना सोयीस्कर विसर पडतो. टेंभू प्रकल्प विचारात घेऊन आपण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. औद्योगिक वसाहत प्रश्न कालपर्यंत माळढोक पक्षी अभयारण्यामुळे मागे पडला. पण आता आरक्षण उठले आहे, केवळ वनजमिनीवर आरक्षण आहे. मग औद्योगिक वसाहत का होऊ शकत नाही. शेजारी कर्जतचे आमदार रोहित पवार औद्योगिक वसाहत मंजूर करून आणतात. मग ही राजकीय इच्छाशक्ती आपल्या नेत्यांमध्ये का नाही. आज मुंबई, पुणे, शिरूर, पारनेर (सुपा), अहमदनगर, राहुरी, श्रीरामपूर अशा सलग पट्ट्यात औद्योगिक वसाहत आहे. फक्त श्रीगोंदे अपवाद आहे. यासाठी आपण समविचारी युवकांना बरोबर घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगून आरोग्याबाबत श्रीगोंदे शहर आणि तालुक्यात प्रसूती, हृदयविकार, मधुमेह, एक्स-रे, सोनोग्राफी, सिझेरियनबाबत उपचार सरकारी रुग्णालयात मिळत नसल्याने लोकांची गैरसोय होते. यावर देखील मार्ग शोधण्याची गरज आहे. ही सर्व यंत्रसामुग्री आणण्यासाठी आपण पाठपुरावा करू. नुकतेच उपजिल्हा रुग्णालयासाठी मान्यता मिळाली. पण काम सुरू नाही. श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयात सुविधा सुरू होण्यासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे डांगे यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...