आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली येथून अल्पवयीन मुलीस पळवून आणून खोलीमध्ये डांबून अत्याचार करण्यात आला होता. मुलीवर अत्याचार करणारा नीलेश सुनील उमाप (वय ३४) आणि तिला पळवून आणणारी महिला माया रमेश आगलावे (वय ४०, दोघे मूळ रा. इंदिरानगर, कळमनुरी, जि. हिंगोली, सध्या रा. शिवाजीनगर, निंबळक, ता. नगर) या दोघांना १० वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली. विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
अल्पवयीन पीडित मुलगी ही तिच्या सावत्र आई सोबत हिंगोली जिल्ह्यात राहत होती. तिची सावत्र आई अल्पवयीन मुलीस सतत मारहाण व त्रास देत होती. मुलीची ओळख माया आगलावे हिच्याबरोबर झाली होती. सावत्र आई सोबत मुलींचे वाद झाल्यामुळे ती गावातील मंदिरात जाऊन बसली होती. माया आगलावे हिने आईला समजावून सांगण्याच्या बहाण्याने नगरला घेऊन आली. नीलेश उमाप याच्या मदतीने जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शिवाजीनगर, निंबळक (ता.नगर) येथे आणले. नीलेश याने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने वेळोवेळी अत्याचार केला.
त्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे नीलेश व माया यांनी पीडित मुलीस गोळ्या खायला देऊन तिच्या पोटातील गर्भ पाडला. तिला मारहाण केली जात होती. शेजार्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर मुलीची आरोपींच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. पोलिसांनी बाल कल्याण समितीकडे मुलीचा ताबा दिला. समितीच्या सदस्यांनी पीडित मुलीची चौकशी केल्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये आरोपींविरूध्द गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकिय अधिकार्यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. नीलेश उमाप आणि माया आगलावे यांनी प्रत्येकी १० वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास चार महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.