आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवा राज्य विक्रीस असल्या विदेशी मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून जप्त केला आहे गुरुवारी नगर-पुणे रोडवरील पळवे शिवारात ही कारवाई करण्यात आली.
पथकाने गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्याने भरलेला कंटेनर जप्त केला आहे. कंटेनर मध्ये ७५० मिलीचे विदेशी मद्याचे एकूण ६०० बॉक्स, तसेच १८० मिलीचे ९५० बॉक्स होते. कंटेनरमधून (एमएच ०४ इएल ६०५०) वाहतूक करत असताना वाहन चालक प्रदिप परमेश्वर पवार (रा. तांबोळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्या ताब्यातून सुमारे १.२१ कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर विदेशी मद्यसाठा गोवा राज्यातील महाराष्ट्र सीमेजवळ ताब्यात घेऊन नाशिक येथील टोलनाक्यावर घेऊन जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
बेकायदेशीरपणे परराज्यातील मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू भोसले (खवनी, ता. मोहोळ जि. सोलापूर), निखील कोकाटे (रा. तांबोळी ता. मोहोळ जि. सोलापूर) यांचा गुन्ह्यात सहभाग आहे. पुढील तपास निरीक्षक ओ.बी. बनकर करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.