आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चेबांधणी:श्रीरामपूर नगरपालिकेसाठी ससाणे, कानडे गटाची स्वतंत्र मोर्चेबांधणी ? ; राजकीय वर्तुळात चर्चा

श्रीरामपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांग्रेसच्या पदाधिकारी निवडीत आमदार लहू कानडे व ससाणे गटाचे मतभेद समोर आल्याने नगरपालिका निवडणुकीत परस्पर विरोधी मोर्चेबांधणी सुरू झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पालिका निवडणूकीत दोन्ही गट एकत्रित लढणार का परस्पर विरोधी ? याबाबत विरोधी पक्षालाही उत्सुकता आहे. श्रीरामपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. श्रीरामपूर काँग्रेसमध्ये सध्या आमदार कानडे व करण ससाणे यांचे गट प्रभावी आहेत. नगरपालिका निवडणुकीनंतर अंजुम शेख गटाने ससाणे गटापासून बाजूला जात वेगळा गट स्थापन केला होता.त्यानंतर त्यांनी आदिक व विखे गटाला साद दिली होती.मात्र आमदार कानडे गटाने राजकीय व्युव्हरचना करीत राजकीय बाजी मारण्याचा प्रयत्न केला आहे.त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसपासून दूर गेलेला माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख यांच्या गटाला डिजिटल सदस्यत्व देत आमदार कानडे यांनी त्यांच्या हाती पुन्हा काँग्रेसचा झेंडा दिला. विधानसभा निवडणुकीत ससाणे गटाने आमदार कानडे यांच्या प्रचारात प्रमुख भूमिका बजावली. मात्र, नंतरच्या काळात ससाणे व कानडे गटात दुरावा वाढीस लागला. यातून उक्कलगावात झालेल्या वादाने ठिणगी पडली. त्यानंतर कानडे यांनी बाभळेश्वर-नेवासे रस्त्याच्या शुभारंभप्रसंगी सरपंचांचा सत्कार घडवून आणत स्वतंत्र मोर्चेबांधणीला प्राधान्य दिले होते.

महसूलमंत्र्यांची भूमिका महत्वाची ठरणार दोन गट व पक्षातील विस्कळीतपणा आताच्या पडझडीच्या काळात काँग्रेसला परवडणार नाही. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची ससाणे व कानडे यांच्या मरभेदात महत्त्वाची ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...