आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून पुस्तकाबाहेरील शिक्षण तर मिळतेच त्याच बरोबरच एक जबाबदार नागरिक तयार करण्याचे ते एक प्रभावी माध्यम आहे.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जडण-घडण खुपच आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर लावरे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुळा एज्युकेशन संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने शिंगवेतुकाई ता.नेवासे येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिर उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. शिबीराचे उदघाटन सरपंच सतिष थोरात,उपसरपंच दिपक पुंड, माजी सरपंच योगेश होंडे, पत्रकार विनायक दरंदले व ग्रामसेवक सुनिल तांदळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने, डॉ. मच्छिंद्र वर्पे,डॉ. अविनाश साळवे,डॉ.हरिभाऊ कर्डिले, डॉ.सिद्धार्थ रणयेवले, प्रा. महेश ताके,प्रा.अश्विनी दरंदले, प्रा.रविना शेडगे उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ.झिने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी गावातील लोकांच्या सहभागातून भरीव कामे करावे, असे आवाहन केले. मा सरपंच योगेश होंडे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा खूप महत्त्वाचा वाटा आहे, असे सांगितले.
पत्रकार विनायक दरंदले यांनी शिबिराला शुभेच्छा देताना गावात जलसंधारण, वृक्षलागवड, ग्रामस्वच्छता इत्यादी कामे व्हावीत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ.बाळासाहेब खेडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर पादर यांनी, तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.शरद औटी यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.