आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांची गर्दी:माजी आ. जगताप यांना शुभेच्छा देण्यासाठी कुकडी कारखान्यावर कार्यकर्त्यांची गर्दी

श्रीगोंदे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार राहुल जगताप यांनी गेल्या दहा वर्षात श्रीगोंदे नगर विधानसभा मतदारसंघात तरुणांचे मोठया प्रमाणात नेटवर्क तयार केले आहे. केलेल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. म्हणूनच गुरुवारी जगताप यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुकडी कारखाना स्थळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

माजी आमदार राहुल जगताप यांनी वाढदिवस अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जगताप यांचा गुरुवारी वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्री १२ वाजेनंतर पिपाळगाव पिसा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन केक कापून शुभेच्छा दिल्या. कुकडी कारखान्याचे संचालक व उद्योजक जालिंदर निभोरे, बापू निंभोरे मेजर व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. गुरुवारी सकाळी १० वाजेपासून कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी साखर कारखान्याच्या संपर्क कार्यालयात थांबले होते. श्रीगोंदे नगर, दौड, कर्जत, शिरूर, पुणे या ठिकाणाहून कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. जगताप यांचा सत्कार करून शुभेच्छा देत होते. दुपारच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती.

माजी आमदार जगताप यांनी आपल्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना नेहमी मान सन्मान मिळवून दिला आहे. इतरांना सत्ता मिळावी त्यांनी नेहमी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते विचाराने जोडले गेले आहेत. या जनतेचा विश्वास आणि कार्यकर्ते बळावर राहुल जगताप यांची ध्येयपूर्ती होणार आहे. माजी आमदार राहुल जगताप यांच्या वाढ दिवसा निम्मित हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच तुम्ही ,२०२४ ला पुन्हा आमदार होणार अशा भावना कार्यकर्ते व्यक्त करीत होते.

बातम्या आणखी आहेत...