आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला धक्का:काँग्रसचे माजी उपाध्यक्ष गारदे यांनी घातली राष्ट्रवादीची घडी; आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अनंत गारदे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश शहर काँगेसला धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत मुंबई येथे गारदे यांनी प्रवेश केला.

गारदे यांनी प्रवेश करताच त्यांची, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन राष्ट्रवादीच्या उद्योग आणि व्यापार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधातेही उपस्थित होते.

गारदे हे शहराच्या राजकारणात मागील तीस ते पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे. ते काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. महिनाभरापूर्वी दोन्ही पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, सोमवारी गारदे यांनी मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप तरुण आहेत. त्यांच्याकडे कामाचे व्हीजन आहे. ते भावल्याने मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री पवार यांनी, कामाला सुरुवात करण्याचे सांगितले. त्यानुसार काम करून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करेन, असे गारदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...