आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमधून 3 गुन्हेगारी टोळ्या हद्दपार:जिल्हा पोलिस अधीक्षकांचा दणका; आता जिल्ह्यात पायही ठेवता येणार नाही, नागरिकांना दिलासा

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात संघटीतपणे टोळी तयार करुन बेकायदा कृत्य करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणे, मारामारी करणे, असे गंभीर गुन्हे करुन दहशत निर्माण करणाऱ्या ३ टोळ्या व त्यातील सदस्यांना हद्दपार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तसे आदेश काढले आहेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यालाही एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

टोळीप्रमुख संदीप भाउसाहेब घुगे (वय ३९, रा. मालुंजे ता. संगमनेर) व त्याच्या टोळीतील इतर ५ सदस्यांना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर तालुका, राहाता तालुका व राहुरी तालुका हद्दीतून १ वर्षाकरीता हद्दपार केले आहे. तसा प्रस्ताव संगमनेर तालुका पोलिस स्टेशनने सादर केला होता. त्यानुसार संदीप घुगे याच्यासह मारूती नागरे (वय ६२), विजय डोंगरे (वय ४४), अमोल डोगरे (वय २८), दिपक डोंगरे (वय २७), शशीकांत ऊर्फ मंगेश नागरे (वय २२) यांना हद्दपार करण्यात आले आहे.

बेलवंडी पोलिस स्टेशनच्या प्रस्तावानुसार संघटीतपणे गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या अक्षय सोनवणे (वय २६) याला नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्यावर सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणे, तलवार, कोयत्याने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, सरकारी आदेशाचा अवमान करणे, अग्नीशस्त्र याचा धाक दाखवून दरोडा टाकणे, लाकडी दांडके, गजाने, लाथाबुक्यांनी मारहाण करून जबर दुखापत करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे आदी गुन्हे दाखल आहेत.

भिंगार पोलिस स्टेशन व परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे संघटीतपणे करून दहशत निर्माण करणाऱ्या अविनाश विश्वास जायभाय (वय २४), ऋषिकेश बड़े (वय २३), नितीन उर्फ किरण लाड (वय २२) यांना भिंगार कॅम्प पोलिस यांच्या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...