आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणज्योत मालवली:जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ राळेभात यांचे निधन

जामखेड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ राळेभात (वय ७५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर जामखेड येथील तपनेश्वर गल्ली येथील अमरधाममध्ये ७ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. जगन्नाथ तात्या राळेभात हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते जिल्हा बँकेचे १५ वर्षे संचालक होते.

जामखेड तालुक्यातील सेवा संस्थेवर त्यांचे वर्चस्व होते. जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचे ते वडील होत. आमदार राम शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, मधुकर राळेभात, शिक्षक नेते राम निकम, बाळासाहेब जगताप, अंबादास पिसाळ, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे माजी सभापती सूर्यकांत मोरे, बाबुशेठ टायरवाले, अरुण जाधव, प्रवीण घुले, अंकुशराव ढवळे, माजी सभापती भगवान मुरुमकर, संजय वराट, नासीर पठाण, प्राचार्य श्रीकांत होशिंग, आंबादास पिसाळ आदींनी श्रद्धांजली वाहिली.

बातम्या आणखी आहेत...