आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलावती रुग्णालयात निधन:माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण

देवळाली प्रवराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथील लिलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. डिसेंबर २००१ ते मार्च २००५ पर्यंत ते देवळालीचे प्रथम लोकानियुक्त नगराध्यक्ष होते. तसेच, २०११ मध्ये ते डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते.

जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस आणि विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. चव्हाण यांच्या काळात देवळाली प्रवरामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवले होते. मुस्लिम कब्रस्तानाचा पुनर्वापर हा मोठा निर्णय त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना एकत्र घेऊन केला होता. तसेच, शहरातील रस्ते काँक्रिटीकरण, शिरीष कुमार बालोद्यान, संत तुकाराम महाराज उद्यान, ऐतिहासिक बारव स्वच्छता आदी कामे बाळासाहेब चव्हाण यांच्या काळात झाली होती. त्या काळात देवळाली नगरपालिकेला स्वच्छतेचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...