आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय श्रेयवाद:माजी खासदार स्व. गांधी हेच उड्डाणपुलाचे शिल्पकार; पाहणी करणाऱ्यांना मनसेने खडसावले

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरात उड्डाणपूल साकारला गेला आहे. माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातूनच हा पूल उभा राहिला आहे. स्व. गांधी हेच या उड्डाणपुलाचे खरे शिल्पकार आहेत. काहीजण स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून उड्डाणपूल बांधल्याच्या अविर्भावात पाहणीचा कार्यक्रम करून प्रसिद्धी मिळवताहेत. मात्र उड्डाणपूल स्व. गांधींमुळे झाला याचा विसर पडता कामा नये, अशा शब्दात मनसेचे सचिव नितीन भुतारे यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना खडसावले आहे.

उड्डाणपुलावरून शहरात राजकीय श्रेयवाद रंगात आलेला असतानाच भुतारे यांनी सर्वांनाच स्व. गांधी यांनी उड्डाणपुलासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देत प्रसिद्धी मिळवणाऱ्यांचे कान टोचले आहेत. उड्डाणपूल हे शहरातील प्रत्येक नागरिकांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठीच माजी खासदार दिलीप गांधी यांनी प्रयत्न केले. त्याला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी साथ देत नगरकरांचे स्वप्न पूर्ण केले. आज हे काम पूर्ण होत असताना त्यांनाच या कामाचे श्रेय मिळावे, असा उद्देश असल्याचे भुतारे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...