आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुहास भेट:माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची संजीवनी उद्योग समुहास भेट

कोपरगाव शहर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी संजीवनी उद्योग समुहास भेट देऊन बिनविरोध निवडलेल्या संचालकांचे अभिनंदन केले. सहकारात स्व. शंकरराव कोल्हे यांनी केलेले कार्य अनेक छोटया मोठया कार्यकर्त्यांना सतत ऊर्जा देत राहील, असे आदरांजली वाहतांना ते म्हणाले.

नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी माजी उर्जामंत्री बावनकुळे, साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, भाजपचे शिर्डी लोकसभा मतदांर संघाचे निरीक्षक सुनील कर्जतकर, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांचा सत्कार केला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदार संघासाठी २२० क्षमतेचे वीज उपकेंद्र, यासह प्रलंबित उर्जाविषयक समस्या सोडवताना माजीमंत्री बावनकुळे यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे सांगितले.

जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने देशात प्रथमच ज्यूस टू इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करून यंदाच्या हंगामात उसाचे विक्रमी ऐतिहासिक गाळप केले असून औषधी पॅरासिटामोल प्रकल्प उभारणी सुरू असल्याचे सांगितले.

याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक ज्ञानेश्वर परजणे, विश्वास महाले, बापूसाहेब बारहाते, निले देवकर, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, मनेष गाडे, विलास वाबळे, विलास माळी, त्रंबकराव सरोदे, उषा औताडे, सोनिया पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतीश आव्हाड, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, चीफ केमिस्ट विवेककुमार शुक्ला, चीफ इंजिनियर के. के. शाक्य, शिवाजी दिवटे, प्रकाश डुंबरे, प्रदीप गुरव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...