आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना सावित्रीबाई फुले‎ पुणे विद्यापठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर‎

अकोले‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा‎ जीवनसाधना गौरव पुरस्कार राज्याचे माजी‎ आदिवासी विकास मंत्री व नवी दिल्लीतील‎ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे‎ ‎ कार्याध्यक्ष माजी आमदार‎ ‎ मधुकरराव काशिनाथ‎ ‎ पिचड यांना जाहीर‎ ‎ करण्यात आला आहे.‎ ‎ सावित्रीबाई फुले पुणे‎ ‎ विद्यापीठ वर्धापनदिनी‎ शुक्रवारी (१० फेब्रुवारी) दुपारी ४ वाजता‎ भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना‎ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे,‎ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू‎ कारभारी काळे यांनी पिचड यांना यासंदर्भात‎ पाठवलेले पत्र सोमवारी निवासस्थानी प्राप्त‎ झाले.

याबाबत माजी आमदार वैभव पिचड‎ यांनी माध्यमांना तशी माहीती दिली.‎ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन‎ दिनानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठीत‎ संसाधन व्यक्तिंनी केलेल्या कार्याचा गौरव‎ व्हावा, या उद्देशाने त्यांना सावित्रीबाई फुले‎ पुणे विद्यापीठाकडून दरवर्षी ''जीवनसाधना‎ गौरव'' पुरस्काराने विद्यापीठामार्फत सन्मानित‎ करण्यात येते. राज्यातील आदिवासींचा‎ सर्वांगीण विकास व अकोले तालुक्याला‎ आपले हक्कांचे पाणी मिळवून देणे,‎ तालुक्यात निळवंडे धरणासह विविध‎ लघुपाटबंधरे प्रकल्प व जलसंधारण कार्यक्रम‎ राबविण्यात दिलेल्या योगदानाबद्दल हा‎ पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी १०‎ फेब्रुवारीस विद्यापीठात हा पुरस्कार सोहळा‎ होत आहे. कुलगुरू काळे यांनी पिचड यांना‎ पाठवून पुरस्काराची घोषणा केली.‎

बातम्या आणखी आहेत...