आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे तालुक्यामध्ये पाटपाण्याच्या नियोजनाअभावी तालुक्यातील उभ्या पिकाची राखरांगोळी झाली. याला सर्वस्वी जबाबदार नेवासे तालुक्याचे लोकप्रतिनिधीचे असून पाटपाण्याचे ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा आरोप माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी करून पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन दिले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, घोडेगावचे सरपंच राजेंद्र देसरडा, माजी सरपंच पारस चोरडिया, किरण जावळे, शरद जाधव, वसंतराव काळे आदी उपस्थित होते.
मुळा उजवा कालवा पाणी रोटेशन चालू आसतानी धरणांमध्येही सुमारे १७ टीएमसी मुबलक पाणीसाठा असताना योग्य वेळेत पाटाचे पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके ऊस, कांदा व फळबागा पाण्याअभावी पीक वाया गेली आहेत. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. नेवासे तालुक्यातील पाणी वाटप संस्थेकडून शेतकऱ्यांनाही न्याय मिळत नाही आणि पाणीपट्टी नियमबाह्य अवाच्या सव्वा प्रमाणे वसुली केली जाते. आज नेवासे तालुक्यातील टेलची सर्व गावे माका, पाचुंदा, तेलकुडगाव, जेऊर, चिलेखनवाडी, कुकाणे, अंतरवाली नांदूर, सुकळी, पिंपरी, गेवराई, तरवडी, सुल्तानपूर, पाथरवाला, वाकडी, शिरजगाव, सलाबतपूर, दिंडेगाव, जळका, चिंचोली, बाभूळखेडा मुकिंदापूर, मक्तापूर, गोंडेगाव, म्हसले, हंडीनिमगाव, उस्थळ, खरवंडी तामसवाडी या गावांना पाट पाण्याचे रोटेशन येऊन महिना झाला. तरी देखील आणखी पाणी मिळालेले नाही. या गावांना आणखी दहा दिवस पाणी मिळेल ही शास्वती नाही. मुळा धरणात १७ टीएमसी पाणी आजमितीला शिल्लक असताना केवळ आणि केवळ मागील रोटेशन वेळेवर न सोडल्यामुळे शेतकऱ्यांच दयनीय अवस्था झाली. त्याला जबाबदार कोण? असे सर्व प्रश्न यामुळे शेतकरी करत आहे. दोन दिवसांमध्ये पाटपाण्याचे पूर्ण क्षमतेने नियोजन झाले नाही, तर शेतकरी आंदोलन करण्याची तयारीत आहेत, याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील, असा इशारा निवेदनात दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.