आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले:त्यांच्या कर्तृत्ववाने अहमदनगरला ओळख, पोलिस अधीक्षक मनोज पाटलांचे प्रतिपादन

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मानाचा हा कार्यक्रम सकारात्मक असल्यानेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आदर्शवत असलेल्या ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान करण्याचे भाग्य मला रसिक ग्रुप मुळे मिळाले, त्यांचा सन्मान करताना मी स्वतः सन्मानित होत आहे. असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.

मनोज पाटील म्हणाले, हृदयस्पर्शी कार्यक्रमामुळे मन भरून आले आहे. सर्व सत्कारार्थींच्या विविध क्षेत्रातील उतुंग कामगारीने नगर शहराला समृद्ध केले आहे. त्यांच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाने नगर शहराला वेगळी ओळख व आदर प्राप्त झाला आहे.

विशेष सन्मान

अहमदनगर सांस्कृतिक चळवळीत योगदान देणाऱ्या रसिक ग्रुपच्या वतीने ऋषीपंचमी निमित्त नगर शहराच्या जडणघडणीत व प्रगतीत बहुमोल योगदान देणाऱ्या 12 व्यक्तींना जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

यांची उपस्थिती

अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप होते. यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, उद्दोजक प्रेमराज बोथरा, आय. एम. खान, निळकंठ देशमुख, घनश्याम शेलार, शब्दगंध साहित्यीक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, उद्योजक सुनील मुनोत, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यांचा सन्मान

या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर, ज्येष्ठ चित्रकार वसंत विटणकर, साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.मुहंमद आझम, गजराज फॅक्टरीचे संचालक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेशराव चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिका मेधा काळे, ज्येष्ठ प्राध्यापक श्रीकांत बेडेकर, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, मर्चंट बँकेचे ज्येष्ठ संचालक हस्तीमल मुनोत, सामाजिक कार्यकर्ते शशीकांत मुथा, ज्येष्ठ प्राध्यापक मधुसूदन मुळे व रणजीपटू बाबा चांदोरकर यांना शाल, पुष्पहार, ग्रंथ, मोरपीस व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

ऋण फेडण्याचा प्रयत्न

मनोज पाटील पुढे म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक ग्रुपने सर्व सत्कारार्थीं प्रती आदर व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न येथे केला आहे. रसिक ग्रुपच्या या चांगल्या कार्यक्रमामुळे नवी पिढी व आम्ही या व्यक्तींचा आदर्श घेऊ.

नगर शहराचे भूषण

प्रास्ताविकात संयोजक जयंत येलुलकर म्हणाले, या शहराच्या प्रगतीत व सांकृतिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्ती आपल्या नगर शहराचे भूषण आहेत, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...