आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:फळांचे साडेचारशे कॅरेट व हातगाडी आगीत खाक; नगरमधील घटना

अहमदनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग लागल्याने 470 छोटे व मोठे फळांचे कॅरेट व फळविक्रीची हातगाडी जळून खाक झाली. आज दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तौसिफ नुर मोहमद बागवान (वय 32, रा. काटवन खंडोबा, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बागवान व त्यांचे मित्र आवेज अलनसिर बागवान या दोघांचा फळविक्रीचा व्यावसाय आहे. ते फळविक्रीचे कॅरेट तसेच हातगाडी वसिम शेख व सादाब शेख यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत ठेवत असत. शुक्रवारी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान फळविक्रीचे रिकामे कॅरेट आणि हातगाडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये 46 हजार 500 रूपयांचे कॅरेट आणि पाच हजार रूपयांची हातगाडी असा 51 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. कोतवाली पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान यापूर्वीही शहरातील इतर भागात अशा घटना घडल्या आहेत. दुचाकी जाळण्याचे प्रकारही घडले होते. त्याचा तपास अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे या घटनेचा तरी तपास होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...