आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस दणका:छिंदम बंधूंसह जिल्ह्यातील चार टोळ्या हद्दपार; सराईत गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षकांचा दणका

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी उपमहापौरश्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना एक वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर तीन टोळ्यांनाही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हद्दपार केले.

जिल्ह्यात संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करून दुखापत करणे, गंभीर दुखापत रक्कम बळजबरीने काढून घेणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, धार्मीक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, अनाधिकाराने मालमत्तेचे नुकसान करणे असे मालाविरुद्ध व शरिराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळ्यांवर हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. श्रीपाद शंकर छिंदम व सदस्य श्रीकांत शंकर छिंदम (रा. मोहनबाग, दिल्लीगेट) यांना तडीपार करण्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी प्रस्ताव पाठवला होता. तसेच, संदीप भाऊसाहेब घुगे (वय ३९, रा. मालुंजे ता. संगमनेर), मारूती सगाजी नागरे (वय ६२, रा. मालुंजे ता. संगमनेर), विजय बच्चु डोंगरे (वय ४४, रा. मालुंजे ता. संगमनेर), अमोल सोमनाथ डोगरे (वय २८, रा. मालुंजे ता. संगमनेर), दिपक सोमनाथ डोगरे (वय २७, रा. मालुंजे ता. संगमनेर), शशीकांत ऊर्फ मंगेश शिवाजी नागरे (वय २२, रा. मालुंजे ता.संगमनेर) यांना संगमनेर तालुका, राहाता तालुका व राहुरी तालुका हद्दीतून १ वर्षाकरीता हद्दपार केले आहे. संगमनेर तालुका पोलिस स्टेशनने प्रस्ताव सादर केला होता.

बेलवंडी पोलिस स्टेशनच्या प्रस्तावानुसार अक्षय सुभाष सोनवणे (वय २६, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर) याला जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. भिंगार पोलिस स्टेशन व परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या अविनाश विश्वास जायभाय (वय २४ रा. दुधसागर सोसायटी, केडगाव), ऋषिकेश अशोक बडे (वय २३ रा. भगवानबाबा नगर सारसनगर), नितीन उर्फ किरण किसन लाड (वय २२ रा. भगवानबाबा नगर, सारसनगर) यांना अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...