आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:कर्जत पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचारी बनले फौजदार

कर्जत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत पोलिस ठाण्यातील तब्बल चार पोलिस कर्मचाऱ्यांना एकाचवेळी पोलीस उपनिरीक्षक होण्याची संधी मिळाल्याने राज्यातील पोलिस खात्यात कर्जत पोलिस ठाण्याची चर्चा सुरू आहे. गणेश आघाव, संतोष फुंदे, मुस्तफा शेख, किशोर गावडे अशी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दरवर्षी पोलिस खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार यांच्यासाठी परीक्षा घेतली जाते. पोलिस कॉन्स्टेबल म्हणून किमान पाच वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना या परीक्षेसाठी बसता येते. यावर्षी राज्यात २५० कर्मचारी उत्तीर्ण झाले.

गणेश आघाव यांना ४०० पैकी ३२८, संतोष फुंदे यांना ३२७, मुस्तफा शेख यांना ३२७, किशोर गावडे यांना ३३० असे गुण मिळाले आहेत. चारही पोलिस कर्मचारी गेली नऊ वर्षांपासून कर्जत पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. आता लवकरच ते फौजदार होणार आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पेढा भरवून अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...