आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:चार पोलिस ठाण्यातील प्रभारी राज संपुष्टात; अधीक्षक ओला यांनी केल्या नियुक्त्या

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील संगमनेर तालुका, राजूर, साई मंदिर सुरक्षा व बेलवंडी पोलिस ठाण्यात असलेले प्रभारी राज संपुष्टात आणले आहे. या ठिकाणी पूर्ण वेळ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांची बदली संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्तीस असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांची राजूर पोलिस ठाण्यात, मानवसंसाधन शाखेचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांची बेलवंडी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मानवसंसाधनचा अतिरिक्त पदभार नियंत्रण कक्षाचे निरीक्षक बाजीराव पोवार यांच्याकडे देण्यात आला आहे. महिला व बाल अपराध प्रतिबंधक कक्ष आणि भरोसा सेलचे निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची बदली साई मंदिर सुरक्षा, शिर्डी येथे करण्यात आली. दरम्यान, ३७ उपनिरीक्षकांना जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...