आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश संपादन:कळसेश्वर विद्यालयातील चार विद्यार्थी विभागीय पातळीवर

अकोले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराटे क्रीडास्पर्धेत कळसेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थीनी प्राची सतीश वाकचौरे, स्नेहल विनोद हुलवळे व लांब उडी स्पर्धेत आदित्य विजय मोहिते व उंच उडी स्पर्धेत सारंग विश्वास ढगे यांनी जिल्हास्तरावर यश संपादन केले. त्यामुळै त्यांची निवड आता विभागीय पातळीवर झाली आहे.जिल्हा क्रीडा समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वाडिया पार्कजिल्हा क्रीडा संकुलात घेतलेल्या स्पर्धेत हे यश संपादन केले.

१७ वर्षे वयोगटातील मुली कराटे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील अगस्ति एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसेश्वर विद्यालय, कळस बुद्रुक विद्यालयातील प्राची सतीश वाकचौरे व स्नेहल विनोद हुलवळे या खेळाडूंनी विजेतेपद पटकाविले. त्यांची विभागीय पातळीवर खेळात निवड झाली आहे. लांब उडी स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात आदित्य विजय मोहिते व उंच उडीमध्ये सारंग विश्वास ढगे यांनी तालुका पातळीवर विजेतेपद मिळवून जिल्हा स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेण्यास निवड झाली.

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सुनिता शेलार, क्रीडा शिक्षक शिवाजी आवारी, मच्छिंद्र साळुंके, कुमार पालवे, केशव महाले, गीतांजली खरबस, मनिषा शिंदे, नंदा बिबवे, प्रतिक्षा घुले यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे, अगस्ति एजुकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शैलजा पोखरकर, सचिव दुर्गाबाई नाईकवाडी, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, सरपंच राजेंद्र गवांदे, विनय वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...