आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 स्वतंत्र घटना‎:दोन दिवसांत नगरमधून‎ चार विद्यार्थी झाले बेपत्ता‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातून चार जण बेपत्ता‎ झाल्याच्या चार घटना घडल्याने‎ खळबळ उडाली आहे. या संदर्भात‎ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले‎ आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध‎ सुरू करण्यात आला आहे.‎ एक विद्यार्थी पेमराज सारडा‎ महाविद्यालयात ११ वीत शिक्षण‎ घेत होता. २ फेब्रवारीला‎ नेहमीप्रमाणे कॉलेजला जातो‎ म्हणून तो घराबाहेर गेला. मात्र तो‎ घरी आलाच नाही. त्याच्या‎ मोबाइलही बंद आहे.

तर दुसरा‎ विद्यार्थी रेसिडेन्सिअल कॉलेज येथे‎ शिक्षण घेत आहे. २ फेब्रुवारीला तो‎ कोणाला न सांगता घराबाहेर गेला.‎ अद्याप तो घरी आला नाही. त्यास‎ अज्ञात इसमाने कशाचे तरी अामिष‎ दाखवून पळवून नेले आहे. तिसरा‎ विद्यार्थी न्यू आर्टस् कॉलेजला‎ जातो म्हणून गेला. परत घरी‎ आलाच नाही. तर ३ फेब्रुवारीला‎ एका युवतीला सकाळी‎ साडेदहाच्या सुमारास घराजवळून‎ अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे‎ फिर्यादीत म्हटले आहे. या चारही‎ घटनांची कोतवाली पोलिस‎ ठाण्यात स्वतंत्र नोंद करण्यात‎ आली आहे. अधिक तपास पोलिस‎ करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...