आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:नगर शहरासह जिल्हाभरातून चार तलवारी जप्त; स्थानिक गुन्हेची कारवाई

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहरासह, एमआयडीसी, राहुरी, लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून चार तलवारी जप्त केल्या आहेत. तलवारी बाळगणार्‍यांविरूध्द संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

कोल्हार बु. (ता. राहाता) शिवारात तलवार घेऊन फिरणार्‍या अमजद रशिद अत्तार (वय २९ रा. कोल्हार बु.) याला पथकाने पकडले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. अंमलदार राहुल सोळुंके यांच्या फिर्यादीवरून अत्तार विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हार खुर्द शिवारात तलवार घेऊन फिरणारे अजय प्रभाकर पेटारे (वय २८), संकेत दीपक कापसे (वय २५, दोघे रा. कोल्हार बु.) यांना पकडण्यात आले.अंमलदार रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी बायपास (ता. नगर) शिवारात पोलिसांनी सापळा लावून अनिकेत राजेंद्र घोडेकर (वय २२ रा. घोडेगाव ता. नेवासा) याला पकडले. त्याच्याकडून एक तलवार, दुचाकी व मोबाईल असा एक लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान त्याचा साथीदार जॉय त्रिभुवन (रा. नवनागापूर) हा पसार झाला. या दोघांविरूध्द अंमलदार लक्ष्मण खोकले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपोवन रोडवरील नाना चौकात तलवार घेऊन फिरणारा अक्षय बहिरू तागड (वय २५ रा. तागडनगर, तपोवन, सावेडी) याला पकडले. अंमलदार योगेश सातपुते यांच्या फिर्यादीवरून तागड विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, अंमलदार बबन मखरे, विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन अडबल, राहुल सोळुंके, रणजित जाधव, संभाजी कोतकर, संदीप घोडके, संदीप पवार, रवी सोनटक्के, दिलीप शिंदे, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...