आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेवाश्याजवळ चौघांचा गोदापात्रात बुडून मृत्यू:एकाचा मृतदेह हाती, तिघांचा शोध सुरू; कावडीने प्रवास भोवला प्रवरासंगममधील घटना

अहमदनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील चार युवक पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ मंदिराच्या दर्शनासाठी जात होते. दुपारी चारच्या सुमारास नेवासा टोका येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात हे युवक अंघोळीसाठी गोदावरी नदीच्या पात्रात उतरले होतेउतरले होते. यावेळी एक जण बुडाला असताना त्याला वाचवण्यासाठी तिघेजण गेले आणि हे तिघेही जण बुडाले अशी माहिती गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे.

यामध्ये शंकर पारसनाथ घोडके वय 29 अक्षय भागिनाथ गोरे वय 11 बाबासाहेब अशोक गोरे वय 31 या तिघांचे मृतदेह मिळाले आहेत. तर नागेश दिलीप गोरे वय 19 याचा शोध सुरू असल्याची माहिती तहसीलदार सतीश सोनी यांनी दिली आहे.

दुपारी साडेतीन ते 4 च्या दरम्यान ही घटना घडली.

या मुलांचा शोध घेण्यासाठी औरंगाबाद मनपाचे पथक पोहोचले असून पाच जणांची टीम यांचा शोध घेत आहे. ही घटना सिद्धेश्वर मंदिर परिसरात नेवासा टोका तालुका नेवासा हद्दीत संभाजीनगर व अहमदनगर हद्द जवळ घडली आहे. हे चारही युवक वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील रहिवासी आहेत.

हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत....

बातम्या आणखी आहेत...