आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा:व्यवसायाचे आमिष दाखवून फसवणूक

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका कंपनीने तीन लाख रूपये घेऊन खाद्य तेल काढण्याची मशीन दिली. परंतू करारनामा करून ठरल्याप्रमाणे कंपनीने माल न देता फसवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरिता अशोक पंडीत (वय २२ रा. वसंत टॉकीजजवळ, माळीवाडा) यांनी फिर्याद दिली आहे.

बायोलाइफ अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड फॅमिली वेलनेस कंपनीचे मालक बंडु किसनराव वाघ (रा. आहीरे गाव, वारजे, माळीवाडी, पुणे), अमोल पोपटराव मेटे (रा. सोमवार पेठ, पुणे), निता रामदास पाटील (रा. शिंदे मळा, सावेडी, नगर), निलिमा अनिल खाटेकर (रा. बालिकाश्रम रोड, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नगरमधून विजय संताजीराव औटी, मनिषा कैलास हुंडेकरी, सुजीत रत्नाकर खरमाळे, शितल अभयसिंग भगत यांचीही फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...