आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलिबाग (जि. रायगड) येथील एका कंपनीची ५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दीपक रंगनाथ भोर व सुहास किसन महांडुळे (दोघे रा. भोरवाडी, ता. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरम्यान, या गुन्ह्यात अटकेत असलेल्या महेश बबन भोर (रा. निमगाव वाघा) यालाही पुन्हा तीन दिवस पोलिस कोठडी दिली.
अलिबाग येथील प्रिमीयम चीक फिड्स कंपनीची केडगाव येथे शाखा आहे. कंपनी पोल्ट्री चालक शेतकऱ्यांशी करार करून त्यांना बॉयलर कोंबड्यांची पिल्ले, खाद्य आणि औषधे देते. शेतकरी ती पिल्ले वाढवतात व त्या मोबदल्यात त्यांना पिल्लांच्या वजनावरून पैसे दिले जातात. यात संबंधितांशी करार केले जातात. केडगाव शाखेकडून अनिल गुंजाळ, सुहास महांडुळे, रघुनाथ भोर या शेतकऱ्यास दिलेले पक्षी व खाद्य शेतकऱ्यांनी परस्पर विकलेले असल्याचे केडगाव येथील शाखा व्यवस्थापक शिवाजी विश्वनाथ गायकवाड यांनी कंपनीचे मालक शाम भालचंद्र ढवण यांना कळवले. त्यानंतर ढवण यांनी लेखापरीक्षक संदेश हिराचंद दांडेकर (मेढेखार, ता. अलिबाग, जि. रायगड) यांना शाखेचे लेखा परीक्षण करण्यास व कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यास सांगितले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.