आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर, जि. अहमदनगर या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले. अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) मुलींसाठी ४ महिने प्रशिक्षणाचे निवासी व भोजन व्यवस्थेसह दिनांक १ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांनी दिली आहे.
आदिवासी मुलींना प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवाशी दाखला किंवा रेशन कार्ड, डोमीसाईल दाखला. ४ पासपोर्ट साईज फोटो तसेच वजन किमान ४५ कि.ग्रॅ. असावे तसेच वय १८ ते २५ वर्ष व उंची कमीत कमी १५५ सें.मी. आवश्यक असणार आहे.
प्रशिक्षणार्थींची निवड शारीरिक क्षमता चाचणी लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार असुन २५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंतच प्रशिक्षणार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता.अकोले, जि.अहमदनगर या ठिकाणी स्विकारले जाणार असुन मुदतीनंतर प्राप्त अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.