आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम:नगर शहरात शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे मोफत वितरण

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने गणेशोत्सवानिमित्त शहर व परिसरात भाविकांना शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे मोफत वितरण करण्यात आले. पर्यावरण पूरक गणपती बसवा व निसर्गाचे संरक्षण करा, हा संदेश देत जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्ष अंबिका बनसोडे व सचिव धनाजी बनसोडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.घरोघरी व कार्यालयांत शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होण्याच्या उद्देशाने मंगळवारी (३० ऑगस्ट) हा उपक्रम राबवण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार संग्राम जगताप, धर्मदाय आयुक्त वंदना पाटील-चव्हाण व उपजिल्हाधिकारी पाटील यांना या अभियानांतर्गत शाडू मातीच्या गणेशमूर्ती भेट देण्यात आल्या. तसेच शहर व उपनगरात ६५ शाडूच्या मूर्तींचे वितरण नागरिकांना करण्यात आले. नागरिकांनी या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती बहुतांशी काळ पाण्यात विरघळत नाही, यातून नदी, विहीर व पाण्याचे स्त्रोत असलेल्या तळ्यात प्रदूषण वाढते. घरोघरी माती पासून तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...