आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:प्रवरेत पोलिस व सैनिकी भरतीचे मोफत मार्गदर्शन

लोणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील लोणी, आश्वी, कोल्हार सात्रळ, राहाता यांसह १४ ठिकाणी मोफत पोलिस आणि सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण सुविधा सुरू केल्याची माहिती अतांत्रिक विभागाचे संचालक डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली. राहाता, संगमनेर, कोपरगाव, राहुरी आणि श्रीरामपूर येथील संस्थेच्या १४ विद्यालये व महाविद्यालयांत हे प्रशिक्षण दिले जात आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना अनुभवी अध्यापक, ग्रंथालय, इंटनेट सुविधावर आधारित अभ्यासिका, वसतीगृह, रनिंग ट्रॅकसह मैदान, सराव चाचणी यांसह नाशिक, नगर, पुणे येथील तज्ञांसह क्रीडा अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. पोलिस आणि सैनिकी भरतीसह संस्थेच्या माध्यमातून तलाठी, आरोग्यसेवक, सुरक्षारक्षक आदींसह स्पर्धा परीक्षेबाबतही मार्गदर्शन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...