आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळंदीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेत शिरोळे दाम्पत्य:वारकऱ्यांची केली मोफत आरोग्य तपासणी; 500 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार

अहमदनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. भास्कर शिरोळे आणि डॉ. स्मिता शिरोळे या दाम्पत्याने आळंदी येथे कार्तिकी एकादशीसाठी गेलेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपसाणी करत, 500 पेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. औनित्यसेवा प्रतिष्ठान माध्यमातून गेली पंचवीस वर्षांपासून सामाजिक कामे करीत, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून ते काम पाहतात.

वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान

वैद्यकीय व्यवसायात काम करताना डॉक्टर शिरोळे दापत्याने गोरगरीब गरजू घटकांना वैद्यकीय मदत करीत आजपर्यंत मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. यात्रा, जत्रा उस्तव असो की दिंडी पायी वारी असो.पंढरपूर, आळंदी या ठिकाणी आवर्जून जात भाविकांच्या रुग्ण सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. डॉ. शिरोळे दाम्पंत्य आळंदी येथे थांबून रुग्ण सेवेसाठी योगदान देत आहेत. यामध्ये मोफत उपचार करीत मोफत औषधे देऊन त्यांनी पारनेर तालुक्यातील भाविकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा सेवाभाव केला आहे.

वारकऱ्यांची मोफत आरोग्या तपासणी

यामध्ये श्रीराम पायी दिंडी सोहळा निघोज, श्री संत भाऊसाहेब महाराज पायी दिंडी सोहळा वासुंदे, कळस ते आळंदी पायी दिंडी सोहळा कळस, शिरापुर ते आळंदी पायी दिंडी सोहळा शिरापुर, संगमेश्वर पायी दिंडी सोहळा पाडली आळे, गजानन महाराज पायी दिंडी सोहळा म्हस्केवाडी, काळेश्वर पायी दिंडी सोहळा म्हसे, भैरवनाथ वारकरी सेवा मंडळ लोणी मावळा यामधील पाचशे पेक्षा जास्त रुग्णांची सेवा करण्याचे काम डॉक्टर शिरोळे दांपत्याने केले आहे. यावेळी कचरुशेठ डेरे व विशाल घोलप त्यांच्या समवेत होते. डॉक्टर शिरोळे दांपत्याच्या या वैद्यकीय सेवेतील सेवाभावाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...