आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातणावपूर्ण जीवनशैली असणार्या पत्रकारांसाठी नियमित आरोग्य तपासणी गरजेची गोष्ट आहे. आपल्या कुटुंबीयांसाठी पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शनिवारी (3 डिसेंबरला ) केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या स्थापना दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद, अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डिजिटल मीडिया परिषद यांच्यावतीने पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, हॉस्पिटलचे संचालक डॉ. शशीकांत फाटके, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विजय गव्हाळे, वसिम हुंडेकरी, डॉ. वैशाली काटकर, डॉ. प्रदिप जयस्वाल, डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ. महेश मुळे, डॉ. नीलेश शेळके, डॉ. तुषार तनपुरे, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, मराठी पत्रकार परिषद सातत्याने पत्रकारांना एकत्र करून, त्यांच्या कुटुंबीयांसाठी चांगले उपक्रम राबवित आहे. तर त्यांच्या अडचणी देखील सोडविण्याचे काम करते. पत्रकार नेहमीच तणावपूर्ण वातावरणात काम करत असतो. आरोग्याबाबत जागृक न राहिल्यास शेवटी संधी मिळणे देखील अवघड होऊन बसते. वेळोवेळी आरोग्य तपासण्या सदृढ आरोग्याचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, आरोग्य ही मनुष्याची खरी संपत्ती आहे. त्याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.डॉ. शशिकांत फाटके यांनी स्पर्धामय धकाधकीच्या जीवनात पत्रकारांनी आरोग्य जपणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी वेळेवर आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे.
प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी केले.तर पाहुण्यांचे स्वागत मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस स्वागत मन्सूर शेख यांनी केले. सूत्रसंचालन दिनेश जोशी यांनी तर. आभार आफताब शेख यांनी मानले.
24 कोटी रुपये खर्च करून बुरुडगाव येथे अद्यावत महापालिकेच्या प्रशस्त रुग्णालय सुरू केले जाणार आहे. लवकरच शहर व उपनगरात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करुन त्याद्वारे आरोग्य सेवा महापालिकेच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.