आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगांची तपासणी:मोफत तपासणी शिबिरात 750 दिव्यांगांची तपासणी ; उमेदवारांना साधनांचे वाटप केले जाणार

राहुरी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी येथे दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या मोफत तपासणी शिबिरात ७५० दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नगर तसेच विखे फाऊंडेशन संचलित जिल्हा अपंग (दिव्यांग) पुनर्वसन केंद्र नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथे सोमवारी दिव्यांगासाठी मोफत साहाय्यक साधने वाटप तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे,रविंद्र म्हसे,शिवाजी सोनवणे,डॉ.संजय भळगट, आर. आर. तनपुरे, सुरसिंग पवार,अर्जुन बाचकर, राजेंद्र उंडे, सुरेश बानकर उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात तपासणीसाठी सकाळपासुनच दिव्यांगांची गर्दी झाली होती. पात्र उमेदवारांना लवकरच सहाय्यक साधनांचे वाटप केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...