आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:नलगे फाउंडेशनच्या माध्यमातून गरजुंना मोफत उपचार; माजी आमदार राहूल जगताप यांचे प्रतिपादन

श्रीगोंदे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजेंद्र नलगे यांनी अनिता नलगे मेमोरियल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. या माध्यमातून सर्वसामान्य गरजू व्यक्तीला मोफत उपचार मिळणार आहेत. अनिता नलगे यांचे विचार व आठवणी या मेमोरियल च्या माध्यमातून डोळ्यासमोर राहतील. पुढील पिढीसाठी मार्गदर्शक असा हा उपक्रम असल्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी केले.

ते कोळगाव येथे अनिता नलगे यांच्या ४५ व्या जयंती निमित्त अनिता राजेंद्र नलगे मेमोरियल फाउंडेशनच्या शुभारंभ प्रसंगी बाेलत हाेते. या उद्घाटनाला पॉली फ्रेंड्स कडून ३५ लाख तसेच कुकडी कारखान्याचे चेअरमन जगताप यांच्या कडून पाच लाख असे ४० लाख देणगी जमा झाली. यावेळी सिने पार्श्वगायक, संगीतकार, लोककवी, प्रा. प्रशांत मोरे यांनी हृदयस्पर्शी “बाप सांगतो आईची कहाणी” या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित जनसमुदायाचे मन हेलावून टाकले. याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर, राष्ट्रवादीचे श्रीगोंदे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, श्रीगोंदे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास भारत सेवा संघाचे सचिव प्रकाश जाधव, माजी अध्यक्ष कलापुरे, जिल्हा बँकेचे संचालक संपतराव नेमाने, कामरगाव चे सरपंच कातोरे, चापडगावचे सरपंच सहदेव पातकळ, शंकरराव चव्हाण, अनिल पाचपुते, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, कुकडी कारखान्याचे संचालक सुभाष लगड ,मच्छिंद्र नलगे, श्रीगोंदे कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, माजी उपसभापती बाळासाहेब नलगे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...