आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षकपदी नियुक्ती:एमपीएससीच्या मुलाखतीला जाण्यासाठी मित्रांनी दिले पैसे, बूट अन‌् शर्ट

कुकाणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरच्या परिस्थितीमुळे ‘एमपीएससी’च्या मुलाखतीला जाण्यासाठी प्रवासासाठी खिशात पैसे नव्हते ते मित्राने दिले, एका मित्राचा बूट तर दुसऱ्याचा पांढरा शर्ट घातला आिण मुलाखत दिली. मनातील जिद्दीला यश आले आणि पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाली. हा प्रेरणादायी संघर्ष आहे, असे नेवाशाचे पाेलिस निरीक्षक विजय करे यांचा.

निरीक्षक करे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर विद्यालयीन शिक्षण फलटणच्या मालोजीराव विद्यालयात पुढे पदवी कोल्हापूर व एमएससी अॅग्री राहुरीत झाले. २००५ मध्ये ते एमपीएससीत उत्तीर्ण झाले. करे यांचे वडील शेतकरी कुटुंबातील. करे दहावीला असताना १०-२२ जनावरे सांभाळून शिक्षण घेत वडिलांनी कधी कधी व्याजाने पैसे घेतले. पण शिक्षण थांबू दिले नाही. त्यामुळे मी आज जो काही आहे तो वडीलांचाच आशीर्वाद व विचारांमुळेच, असे करे म्हणतात. घरच्या आर्थिक प्रतिकुल परिस्थितीवर मात करत करे यांनी मिळवलेला ‘विजय’ निश्चितच आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी असा आहे.

निरीक्षक करे यांना ‘एमपीएससी’च्या मुलाखतीला जायचे होते. पण प्रवासासाठी पैसे नव्हते ते मित्राकडून घेतले. अंगात पांढरा शर्ट व पायात काळा बुट दुसऱ्या मित्रांकडुन घेतले. मुलाखतीला जाण्यापूर्वी मनात विचारांचे काहूर उठले होते यश न मिळाल्यास नोकरी कशी मिळेल नोकरी नाही तर लग्न करुन आपण आपल्यासोबत कुटुंबाची फरफट कशाला करायची. त्यामुळे नोकरी नाही तर लग्नच करणार नाही, ही खुणगाठ मनात बांधलेली. मुलाखत झाली. जिद्दीला यश आले नोकरी मिळाली. कठीण काळात मित्रांची मदत मिळाल्याने हे यश पाहू शकलो, असे करे म्हणतात.

का घेतला होता तो निर्णय?
नोकरी नसली तरी समाजाचे रितीरिवाज, टोमणे यामुळे लग्न करावे लागते मग पुढे संसारात मुलाबाळांना चांगले आयुष्य, शिक्षण कसे देणार हा प्रश्न होता आपल्यासोबत कुटुंबांचीही सहप्रवासात ससे होलपट नको, असे वाटत होते. पण मनी विश्व निर्माण करीन एवढी ताकद बाळगली तरी विजय मिळवता येतो, असे पोलिस निरीक्षक करे म्हणाले.

गरीबी शिक्षणासाठी अडसर ठरू नये मुलांना आर्थिक मदत
परिस्थितीची जाणिव ठेवून गरीबीमुळे कोणाला शिक्षणात अडसर येऊ नये म्हणून मी माझ्या गावाकडच्या तीन जणांना शिक्षणासाठी तर दोघांना ‘एमपीएससी’च्या अभ्यासासाठी आर्थिक मदत केली. दरवर्षी गावाकडच्या शाळेत गरीबांघरच्या मुलांना चपला, वह्या पुस्तके वाटप माझ्या पगारातील काही रकमेतून करत असतो. ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला व्यासपीठ बांधून दिले, असे करे अभिमानाने सांगतात.

पैशाशिवाय कोणाचेही शिक्षण खोळंबत नाही
‘एमपीएससी’ची मुलाखत देताना देशसेवा, समाजसेवा करायची अशी उत्तरे न देता मला नोकरीची गरज आहे, हे मी मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले. माझा प्रामाणिक हेतू अधिकाऱ्यांना समजला. मुलाखतीत मी यशस्वी झालाे, खरं तर इच्छाशक्ती दांडगी असली तर पैशाशिवाय कोणाचेही शिक्षण खोळंबत नाही, असे पोलिस निरीक्षक करे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...