आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीनंतर शिक्षण व त्यानंतर नोकरी-व्यवसायानिमित् त दुरावलेले मित्र २८ वर्षांनंतर एकत्र आले. चाळीशी ओलांडलेले हे मित्र-मैत्रिणी आता वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले आहेत. आयुष्याच्या या वळणावर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील जिल्हा परिषदेत दहावीपर्यंत एकत्र शिकलेले मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन नगर येथे एकत्र येऊन ‘गेट-टूगेदर’ घेतले. या कार्यक्रमात पुणे, बीड, परभणी, औरंगाबाद, मुंबई, नाशिक य ेथे स्थायिक झालेले मित्र-मैत्रिणी सहभागी झाले होते.
त्यात प्रसिद्ध व्यावसायिक रितेश लुनावत, अभिजीत डुंगरवाल, आदिनाथ सूर्यवंशी, संदीप कानडे, अतीश गाडेकर, आनंद बाफना, नारायण गाडेकर, संतोश गटागट, विनोद व्यवहारे, आदिनाथ नागरगोजे, डाॅ. अशोक मिसाळ, डाॅ. सचिन चव्हाण, डाॅ. विठ्ठल ढाकणे, डाॅ. अर्चना पालवे, माधुरी देसरडा, मुख्याध्यापक सीमा बडे, स्वाती कानडे, भाऊसाहेब नेटके, बद्रिनाथ पवार, नवनाथ पानखडे, लिंबाजी पवार, हनुमंत खेडकर, विजय केदार, अशोक शेकडे, कल्याण ढाकणे, मीना येवले, ज्योती अंदुरे, सुलभा तुपे, सुनिता जायभाये, सारिका डुंगरवाल, वैशाली लोढा, अरुणा केदार आदी सहभागी झाले होते. मित्रांनी शालेय आठवणींना उजाळा देताना, आयुष्यात आलेले अनुभव सर्वांसमोर मांडले. सूत्रसंचालन पत्रकार सूर्यकांत नेटके यांनी , तर अभिजित डुंगरवाल यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.