आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचा ३० वा स्मृतीदिन २८ मार्च रोजी साजरा होत आहे. यानिमित्त जैन सोशल फेडरेशनतर्फे आनंदधाम येथे भगवान महावीर व्याख्यानमाला २०२२ चे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रायोजक शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या सहकार्यातून २१ ते २७ मार्च या कालावधीत रोज सायंकाळी सात वाजता व्याख्यानमाला होणार आहे. कोरोनामुळे व्याख्यानमालेच्या उपक्रमास दोन वर्षे खंड पडला होता. आता ही वैचारिक मेजवानीची परंपरा पुन्हा सुरू होत असल्याचे जैन सोशल फेडरेशनतर्फे सांगण्यात आले.
भगवान महावीर व्याख्यानमालेत २१ मार्च रोजी इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (नवी दिल्ली)चे पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांचे ‘करोनानंतरचे आपण’ या विषयावर व्याख्यान होईल. २२ मार्च रोजी प्रसिद्ध वक्ता, ट्रेनर पुष्कर औरंगाबादकर हे ‘किर्तीरुपी जीवनाचे सूत्र’ या विषयावर पुष्प गुंफतील. २३ मार्च रोजी प्रबोधनकार अभय भंडारी यांचे सुवर्ण युगाच्या प्रवेशव्दारावर भारत या विषयावर व्याख्यान होईल. २४ मार्च रोजी दीपस्तंभ फाउंडेशन, जळगावचे संस्थापक, शिक्षण तज्ज्ञ यजुवेंद्र महाजन यांचे आयुष्यावर बोलू काही या विषयावर व्याख्यान होईल. २५ मार्च रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांचे ए जिंदगी गले लगा ले या विषयावर व्याख्यान होईल. २६ मार्च रोजी प्लास्टिक सर्जन व प्रेरणादायी वक्ते डॉ.विठ्ठल लहाने यांचे यशाचा पासवर्ड या विषयावर व्याख्यान होईल. व्याख्यानमालेची सांगता रविवार २७ मार्च रोजी होणार आहे. यात हास्यसम्राट डॉ.मिर्झा बेग हे कॉमेडीची सुपरफास्ट मिर्झा एक्स्प्रसे सादर करणार आहेत. भगवान महावीर व्याख्यानमालेला अनेक वर्षांची परंपरा आहे. या व्याख्यानमालेचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जैन सोशल फेडरेशनतर्फे करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.