आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार भाव:जुनच्या पहिल्या आठवड्यापासूनच कांद्याला दीड ते दोन हजारांचा भाव

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे चाळीची व्यवस्था नाही, त्यांनी पावसाळ्यापूर्वीच कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. परंतु, मे अखेरपर्यंत कांद्याला अवघा ८०० ते १ हजार १०० प्रतिक्विंटल दर मिळत होता. परंतु, जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच हा दर दीड ते दोन हजार प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला.

कांद्याचे दरातील चढउतार नेहमीच चिंतेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात उत्पादीत झालेला कांदा अत्यल्प दरामुळे चाळीत भरला गेला. मे महिन्यात तीन नंबर कांद्याला प्रतिकिलो १ रूपया ते ६ रूपये प्रतिकिलो एवढाच भाव मिळाला. हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तसेच कांद्यांचा आकारही अपेक्षेपेक्षा लहान राहिल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यातच अत्यल्प भावामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले. ही परिस्थिती मेअखेरपर्यंत कायम होती. परंतु, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या दरात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत कांद्याला दिड ते दोन हजारापर्यंत भाव मिळतो आहे.

भुईमुग ५ हजार तर सोयाबिनला ६ हजारचा दर
भुसार मालाच्या मोढ्यावर सद्यस्थितीत चांगला दर मिळत आहे. ज्वारी २ हजार ३०० ते २ हजार ५०० प्रतिक्विंटल, बाजरीचा भाव कमी असून १ हजार ५०० ते २ हजार ३७५, गहु १ हजार ९०१ ते २ हजार ४००, हरभरा ४ हजार १०० ते ४ हजार २००, सोयाबिन ५ हजार ६०० ते ६००० रूपये, भुईमूग शेंगाला प्रतिक्विंटल ५ हजारांचा भाव मिळाला.

बातम्या आणखी आहेत...