आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोले तालुक्यातील आदिवासीबहुल भागांतून सुरू असलेल्या विविध शासकीय अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा योग्य पद्धतीने मिळतात किंवा नाही, याची पहाणी आश्रमशाळेत प्रत्यक्ष पहाणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माजी अध्यक्ष व सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य सुनीता अशोक भांगरे यांनी घटनास्थळी जाऊन केल्यानंतर जेथे चुकीचे दिसून आले. त्याविरुद्ध आवाज उठवून त्यातील गैरकारभाराची चौकशी मागितल्याचा भलताच राग तालुक्यातील मुतखेल येथील आश्रमशाळेतील मुख्याध्यापक सुशील सतालवार यांना आलेला दिसतो. कारण शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत या सतालवार गुरूजींनी सुनीता भांगरे यांची ही तक्रार आपल्या भावाकडे केल्यानंतर त्याच्या भावाने सुनीता भांगरे यांना मोबाईलवरून थेट जिवे ठार मारून टाकण्याचीच धमकी दिल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली.
जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे या राजूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या शासन नियुक्त माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आहेत. त्यांना शुक्रवारी सकाळर ९१९८६७३३९८०५ या मोबाईलवरून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. मी मुतखेल येथील आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांचा भाऊ बोलतोय. तुम्ही त्याचे शाळेतील कामात हस्तक्षेप करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करीत चौकशी न झाल्यास प्रकल्प कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देऊन त्यास त्रास देत आहेत. याचा परिणाम चांगला होणार नाही. तुम्ही हे थांबवले नाही, तर मी तुम्हास जिवे ठार मारून टाकीन, असा दम या मुख्याध्यापकाच्या भावाने सुनीता भांगरे यांना मोबाईलवरून दिला. पोलिस खात्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन गुंड व्यक्तीचा शोध घ्यावा व दोषींवर तत्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.