आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीची लेखी परीक्षा:आजपासून दहावीची परीक्षा, 950 केंद्रांवर 70,950 विद्यार्थी देणार परीक्षा

नगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून (१५ मार्च) सुरू होत आहे. नगर जिल्ह्यात ९५० परीक्षा केंद्रे आहेत. ७० हजार ९५० विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत. दरम्यान, परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी ७ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव राहिला नाही. त्यामुळे यंदाच्या परीक्षेत बारावीप्रमाणेच अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रति तास वीस मिनिटे अधिकचा वेळ मिळेल.

कोविड १९ चे सर्व नियम पाळावेत, सुरक्षित अंतर ठेवावे, अशा सूचना सर्व केंद्रप्रमुखांना विभागीय शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. दरम्यान शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने प्रत्येक परीक्षा केंद्रास बंदोबस्त देण्याची मागणी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली. संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा समोर हा प्रश्‍न उपस्थित करुन शिक्षण विभागाचे अधीक्षक सुभाष कराळे यांना निवेदन दिले.

गर्दी टाळण्यासाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र
४ एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा चालणार आहे. परीक्षा केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र हे धोरण जाहीर केलेले आहे. त्यामुळे या वर्षी परीक्षा केंद्रांची संख्या वाढलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...