आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातच्या बडोदरा जिल्ह्यातील कोईली येथील इंडियन ऑइल कंपनीच्या रिफायनरी प्रकल्पातून आलेल्या पेट्रोल-डिझेलच्या भूमिगत पाइपलाइनचे २०१९ मध्ये सुरू झालेले काम ८५ टक्के पूर्ण झाले असून नगर, नाशिक व सोलापूर जिल्ह्यातील इंधन डेपोंना थेट या पाइपलाइनद्वारे पेट्रोल-डिझेल मिळेल. विशेष म्हणजे २२ मार्चपासून मनमाड येथील पानेवाडी प्रकल्पाला याच पाइपलाइनद्वारे थेट पेट्रोल- डिझेल दिले जात आहे.
महाराष्ट्रातील इंधन पुरवठ्याचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात नगर व सोलापूरला पुरवठा होईल. यामुळे पेट्रोलियम मंत्रालयाचा पेट्रोल-डिझेलच्या वाहतुकीवर होणारा जहाजांचा खर्च वाचेल, इंधन भेसळीचे प्रकारही थांबतील. नगर जिल्ह्यातील अकोळनेर, नाशिक जिल्ह्यातील मनमाड (पानेवाडी) व सोलापुरातील पकनी डेपोंना हा पुरवठा होईल. पाच वर्षांपासून गुजरात राज्यातील कोईली येथील केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या इंडियन ऑइल रिफायनरी प्रकल्पापासून भूमिगत पाइपलाइनचे काम सुरू होते.
मेच्या शेवटच्या आठवड्यात अकोळनेर व जुलै महिन्यात सोलापूर डेपोला पुरवठा {थेट भूमिगत पाइपलाइनमुळे इंधन भेसळ थांबणार; जहाज वाहतुकीवरचा खर्चही वाचणार कोईली ते सोलापूर : 18 इंच पाइपलाइन नगरजवळील विळद घाट परिसरापासून ही पाइपलाइन सोलापूरकडे जाते. 02 मीटर खोदून शेतजमिनीत पाइपलाइन गेली आहे. महाराष्ट्रात विविध पेट्रोलियम कंपन्यांचे १३ डेपो असून पहिल्या टप्प्यात अकोळनेर, पानेवाडी व पकनी येथील इंडियन ऑइलच्या डेपोंना थेट पाइपलाइनद्वारे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जाणार आहे.
पानेवाडी डेपोला पुरवठा सुरू
२२ मार्च : कोईली येथील प्रकल्पातून पानेवाडी (मनमाड, नाशिक) पेट्रोल- डिझेल पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मे महिन्यात : शेवटच्या आठवड्यात अकोळनेर (अहमदनगर)
जुलै महिन्यात : सोलापूर येथील पाकणी डेपोला पेट्रोल- डिझेलचा पुरवठा या पाइपलाइनद्वारे केला जाईल.
कांडलामार्गे मुंबईत जहाजातून जाणाऱ्या वाहतुकीचा खर्च वाचणार गुजरातेत सर्वाधिक इंधन प्रकल्प असून भारतीय पेट्रोलियमकडून जामनगर, बडोदा येथून कांडलामार्गे जहाजांनी मुंबईतील “जेएनपीटी’ या महाराष्ट्रातील मुख्य प्रकल्पाला पेट्रोल-डिझेल दिले जात होते. त्यानंतर मुंबईतून टँकरद्वारे डेपोंना इंधनाचा पुरवठा केला जात होता.
प्रत्येक तासाला ५०० किलो लिटर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा
गुजरातेतून आलेल्या पाइपलाइनद्वारे तासाला ५०० किलो लिटर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होणार असून एकाच वेळी ५० टँकर इतक्या इंधनाचा पुरवठा करण्याची क्षमता या पाइपलाइनची आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचेल व हे इंधन ३ ते ४ रु. कमी दराने मिळू शकेल.
अकोळनेरमध्ये ६० फुटी ५ टाक्या : अकोळनेर प्रकल्पाला जुलैपासून पाइपलाइनद्वारे पेट्रोल-डिझेल पुरवठा होईल. या प्रकल्पात ६० फूट उंच पाच टाक्या बसवण्यात आल्या असून टेस्टिंगचे काम सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.