आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अत्याधुनिक बंदिस्त नाट्यगृहासाठी निधी द्या

कोपरगाव शहर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या कोपरगाव शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्य स्तर योजनेंतर्गत कोपरगाव नगर परिषदेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.

याप्रसंगी दत्तू कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, डॉ. मिलिंद कोल्हे, विवेक कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, सुमित कोल्हे,पराग संधान, रविकाका बोरावके, साहेबराव रोहोम, दत्तात्रय काले,रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, विक्रम पाचोरे, अविनाश पाठक आदी उपस्थित होते.कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव नगर परिषद ही अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठी नगर परिषद असून, कोपरगाव शहर हे वेगाने विकसित होत आहे. कोपरगाव शहरातील आणि या परिसरातील अनेक कलाकारांनी नाट्य व कलेच्या इतर प्रकारांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठा नावलौकिक प्राप्त केलेला आहे.

नाट्य व कला क्षेत्रात येथील कलाकारांनी उत्तुंग कामगिरी बजावली आहे. कोपरगाव शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह नसल्यामुळे स्थानिक कलावंत आणि रसिकांची मोठी हेळसांड होत आहे. कोपरगाव शहराला वैभवशाली कला व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा जोपासण्यासाठी आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारणे गरजेचे आहे.

शहरात अत्याधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्य स्तर योजनेंतर्गत आवश्यक निधी त्वरित उपलब्ध होण्यासाठी संबंधित यंत्रणेस आदेश द्यावेत, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल
बंदिस्त नाट्यगृहाअभावी स्थानिक कलावंत आणि रसिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरात आधुनिक वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह उभारले गेल्यास कलाकार व रसिकांची सोय होणार आहे. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल, असा विश्वासही स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...