आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे तालुक्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी रस्त्यांबरोबरच विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या विकास कामे जोरात सुरू आहे. चांदा परीसरातील रस्त्यासह विविध विकास कामांसाठी निधीची कमतरता भासु देणार नाही . सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे प्रतिपादन नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता गडाख यांनी केले.
मंत्री गडाख यांच्या निधीतील चांदा मिरीरोड डागवाले वस्ती या विकासकामांचे भूमिपूजन गडाख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य पार्वतीबाई जावळे यांच्या निधीतील श्री महालक्ष्मी मंदिर, खंडोबा मंदिर, श्रीस्वामी समर्थ मंदिर येथे पेव्हिग ब्लॉक, विविध रस्त्यामधील सिमेंट पाईप, तसेच विविध वाड्या वस्त्यांवर सौरपंप बसवणे आदि कामे, तसेच चांदा ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगातील १३ अंगणवाडीतील मुलांना खेळणी साहित्याचे वाटप या कामांचा शुभारंभ गडाख यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषद सदस्य सविता अडसुरे ,पंचायत समिती सदस्य पार्वतीबाई जावळे, कारभारी जावळे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत, अनिल अडसुरे, बाबुराव चौधरी, सरपंच ज्योती जावळे, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, ज्ञानदेव दहातोंडे, विजय चौधरी, संजय भगत, डॉ. विकास दहातोंडे, सोमनाथ दहातोंडे, अशोक चौधरी, लक्ष्मण दहातोंडे ,बाळासाहेब दहातोंडे, सोमा बाजारे, बाळासाहेब दहातोंडे, अरुण बाजारे, सादिक शेख, ग्रामविकास अधिकारी रजनिकांत मोटे, भाऊराव थिटे, नंदू जावळे, दिपक जावळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.