आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री विशाल गणेशाच्या दर्शनाने सर्वांच्याच मनोकामना पूर्ण होतात. अनेक भाविकांची श्रद्धा असल्याने राज्यभर प्रसिद्धीस पावलेला हा श्री विशाल गणेश आहे. देवस्थानचा झालेला सुबक आणि सुंदर जीर्णोद्धार आकर्षक आहे. देवालय ही प्रेरणास्थाने असून, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासनिधी देण्याचा प्रयत्न आहे.
प्रत्येक देवस्थानची वेगळी महती असून, ती सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन प्रदेश भाजपाचे नूतन प्रवक्ते आमदार राम शिंदे यांनी केले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानातर्फे शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी देवस्थानाचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त नितीन पुंड, ज्येष्ठ नेते सदा देवगावकर, सुनील रामदासी, वसंत लोढा, प्रा. भानुदास बेरड, दामोदर बठेजा, सुवेंद्र गांधी, सचिन पारखी, अॅड. विवेक नाईक, तुषार पोटे, महेश नामदे, किशोर बोरा, बाळासाहेब गायकवाड, अनंत देसाई, प्रदीप परदेशी, राजू सातपुते, राजू एकाडे, युवराज पोटे, अनिल सबलोक, बंटी ढापसे, ऋषीकेश आगरकर आदी उपस्थित होते.
अभय आगरकर म्हणाले, की श्री विशाल गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. देवस्थानच्या माध्यमातून भाविकांना सर्वोतोपरी सुविधा पुरविण्यात येत आहेत. शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून जास्तीत जास्त निधी मिळाल्यास, अनेक सुविधा उपलब्ध करुन देणे सोपे होईल. त्यासाठी शिंदे यांनी प्रयत्न करावेत. त्यांच्या रुपाने नगरला एक अभ्यासू नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रास्तविक नितीन पुंड यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.