आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनबुडाचे आरोप:गडाख यांचा विरोधकांवर खापर‎ फोडण्याचा प्रयत्न : मुरकुटे‎

नेवासे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोनई येथील तालुका दूध संघावर‎ वीज चोरी केल्याचा गुन्हा वीज‎ कंपणीकडून दाखल झाल्यानंतर‎ आता आमदार शंकरराव गडाख‎ यांनी विरोधकांकडून ही कारवाई‎ करण्यात आल्याचे सांगत‎ विरोधकांवर खापर फोडण्याचा‎ प्रयत्न करुन वेगळाच ड्रॉमा रचला‎ जात आहे. या कारवाईमध्ये‎ भाजपचा कोणताही संबंध नसून जर‎ त्यांना शंका असेल, तर‎ शनिदेवाच्या चौथऱ्यावर येवून‎ समोरासमोर चर्चा करावी, असे‎ आव्हान भाजपचे माजी आमदार‎ बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासे‎ फाटा येथे घेतलेल्या पत्रकार‎ परिषदेत केला.‎ माजी आमदार मुरकुटे म्हणाले,‎ दुध संघावर वीज चोरीचा गुन्हा‎ विरोधकांकडून दाखल करण्यात‎ आला असल्याचे सांगून‎ विरोधकांकडून सध्या सुडबुद्धीचे‎ राजकारण सुरू असल्याचा आरोप‎ होत आहे. प्रशांत गडाख आजारी‎ असतानाही ही कारवाई केल्याचा‎ आरोप विरोधक करत आहेत.

मी‎ सुध्दा एक गडाखांचा राजकीय‎ विरोधक असून गडाख यांच्यावर‎ झालेल्या कारवाईत माझा आणि‎ भाजपचा कुठलाही संबंध नाही.‎ शनि चौथऱ्यावर येवून समोरासमोर‎ चर्चा करावी. बिनबुडाचे आरोप‎ गडाखांनी विरोधकांवर करू नये. या‎ पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे‎ तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,‎ नेवासे शहराध्यक्ष मनोज पारखे,‎ शरद जाधव, आदिनाथ पटारे व‎ भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...