आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्शगाव:गडाख यांची यशवंत प्रतिष्ठानच्या सदस्यांसह हिवरेबाजारला भेट

सोनई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासाचे मॉडेल असलेल्या आदर्शगाव हिवरेबाजारला यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाख यांनी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांसह नुकतीच भेट देऊन पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. माझी शाळा आदर्शशाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ऐतिहासिक माहिती सांगणारी गावाची स्वागत कमान, आदींची त्यांनी पाहणी केली.

महापुरुषांच्या साहित्याने समृद्ध असलेले वाचनालय, ग्रामसंसद कार्यालय, गावाला मिळालेले पुरस्कार ठेवलेले ग्रामदर्शन, व्यायामशाळा, पाणी व्यवस्थापनासाठी करण्यात आलेले चर, गावच्या चौकांचे उपलब्ध जागेत केलेले सुशोभिकरण आदी ठिकाणी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली. गावाचे ग्रामदैवत असलेले मारुतीरायाचे मनोभावे दर्शन घेत वृक्षारोपनही केले. उदयन गडाख म्हणाले, आदर्शगाव हिवरेबाजारची आजची भेट व पदमश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन यामुळे मनाला नवी उभारी मिळाली.

पद्मश्री पोपटराव पवार यांनी स्वतः फेटा बांधून माझा सन्मान केला. समाजकारणात काम करताना तो प्रेमाचा सन्मान कायम प्रेरणा देत राहील. समृद्ध व स्वयंपूर्ण गाव कसे असावे, याचे मॉडेल असलेले आदर्शगाव हिवरेबाजार आपल्या नगर जिल्ह्यात आहे याचा विशेष अभिमान असल्याचे ते म्हणाले.

माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार शंकरराव गडाख व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतुन यापुढे मोरया चिंचोरे, ता. नेवासा येथे विविध उपक्रम राबवून आदर्शगाव उपक्रमातुन गावास ग्रामसमृद्ध गाव बनवू असा आशावाद यावेळी व्यक्त केला.आदर्शगाव हिवरेबाजारच्या भेटीने नाविन्यपूर्ण व रचनात्मक काम करण्यास प्रेरणा मिळाली.याप्रसंगी पदमश्री पोपटराव पवार, कवी संजीव तनपुरे, सोनईचे सरपंच धनंजय वाघ, यशवंत प्रतिष्ठान सोनईचे सदस्य उदय पालवे, रणजित जाधव, वास्तुविशाद सुभाष शिरसाठ, सुधाकर गडाख आदी उपस्थित होते.

उपक्रम प्रेरणा देणारे
आदर्शगाव हिवरेबाजार मध्ये पदमश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेले उपक्रम प्रेरणा देणारे आहेत. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया चिंचोरे ता नेवासा येथे विविध उपक्रम राबवून गावाचा कायापालट यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या सहकार्यातून करण्यासाठी प्रयत्नशील राहू.''- उदयन गडाख, उपाध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान.

बातम्या आणखी आहेत...